तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »विष्णूची सात रहस्ये

विष्णूची सात रहस्ये

Rated 3.5/5 based on 8 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

भारतीय तत्त्वज्ञानाची  बैठक समजावून देणारी देवदत्त पट्टनायक यांची ‘Seven Secrets of Shiva’ आणि ‘Seven Secrets of Vishnu’ ही दोन पुस्तकं आता ‘शिवाची सात रहस्ये’ आणि ‘विष्णूची सात रहस्ये’ या नावांनी मराठीत उपलब्ध आहेत. भारतीय तत्त्वज्ञानानुसार सृष्टी निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता शिव अशी परमेश्वराची रूपे मानली जातात. या तीनही संकल्पना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारी ही दोन पुस्तके आहेत. ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही, माया सृष्टी म्हणजे काय, विष्णूच्या अनेक अवतरांमागची कारणे, शिव, शंकर, रुद्र, भैरव, अशा शिवाच्या रूपांमधला फरक काय, शिवलिंग ह्या संकल्पनेचा अर्थ काय अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमध्ये मिळतात.

‘शिवाची सात रहस्ये’ या पुस्तकात ‘गणेशाचे रहस्य’ नावाचा विभाग आहे. त्यामध्ये  पट्टनायक यांनी गणेशजन्माची कथा, गणेश या देवतेचा भारतीय कृषी जीवन, संपन्नता, सुबत्ता यांच्याशी कसा निकटचा संबंध आहे हे फार सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. याच पद्धतीने कार्तिकेय, अय्यप्पा, खंडेराय, अर्धनारीश्वर, नटराज यांच्याविषयी आणि दुर्गा, काली, पार्वती, अन्नपूर्णा या शक्तीरूपी देवतेविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळते.  

सत्य युगातला परशुराम, त्रेतायुगातला राम, द्वापर युगातला कृष्ण आणि कली युगातला कल्की--- सृष्टीचा पालनकर्ता विष्णू याचे वेगवेगळ्या युगांमधले हे अवतार आणि त्यांमागची संकल्पना समजून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक ---- विष्णूची सात रहस्ये

परमेश्वरावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांना आवडतील अशी पुस्तके --- शिवाची सात रहस्ये आणि विष्णूची सात रहस्ये

Save

Devdutta Pattanaik यांची इतर पुस्तके

शिवाची सात रहस्ये
जय
देवीची सात रहस्ये
देवदत्त पट्टनायक यांची प्रचंड गाजलेली पुस्तके

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

9788171855285

स्वरूप :

Soft Cover

आकार:

6.5" x 9"

MRP:

`375

सूट :

20%

किंमत :

`300

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top