तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »संगीतविचार

संगीतविचार

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

संगीत' हा शब्द जरी छोटा असला, तरीही अर्थाच्या दृष्टीने त्याची व्यापकता अथांग, अमर्याद आहे. आचार-विचार-उच्चार ह्या त्रिसूत्रींवर आधारित संगीताचा व्यवहार असतो. संगीत ह्या संकल्पनेवर किती तऱ्हेतऱ्हेने विचार होऊ शकतो, हे संगीतविचार या पुस्तकातून सहज जाणवते. बदलत्या परिस्थितीचा संगीतावर होणारा परिणाम, भक्तिसंगीत, लोकप्रयोगामार्फत झालेले संशोधन, रंग आणि संगीत, संगीत आणि धर्माचा संबंध, योग आणि संगीताशी जुळलेले नाते, या क्षेत्रातील मिथके, इथपासून ते संगीतासाठी आवश्यक असणाऱ्या कानाची (चांगले संगीत ऐकण्याच्या सवयीची) देखील किती गरज असते. अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अशोक रानडे यांनी आपले संगीतविषयक विचार मांडले आहेत. पुस्तकाची भाषा इतकी सहज सोपी ठेवली आहे की, संगीताचा अभ्यास नसणाऱ्या मंडळींच्या हातात हे पुस्तक दिल्यास तेदेखील उत्सुकतेने वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवू शकणार नाही. यातच ह्या पुस्तकाचे यश सामावलेले आहे.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-978-8

स्वरूप :

Hard Cover

किंमत :

`450

Buy Now

अशोक रानडे

संगीताचा सखोल, व्यापक आणि बंधमुक्त शोध हाच अशोक रानडे यांचा जीवनध्यास आहे.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top