तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Literary Essay » ऋतुचक्र

ऋतुचक्र

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

ऋतुंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. त्यांनी प्रत्येक महिन्याला दिलेली विशेषणे- वसंत हृदय, चैत्रसखा वैशाख, ज्येष्ठातले पहिले मेघ मंडळ इ. समर्पक आहेत. विविध वृक्ष, त्यांची पाने-फुले-फळे, पानगळ यांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन तसेच पौराणिक दाखले व भावानुभवाची विविध रूपे या निसर्ग चिंतनातून गुंफलेली आहेत. परंतु दुर्गाबाईंच्या शास्त्रीय दृष्टीकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड हे या ललितनिबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे.
जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब, पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी वडाची हिरवी पाने, पारिजातकाच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांवरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद... या वर्णनांतून दुर्गाबाईंसारख्या रसिक कलावंताची अनुभूती सृष्टीतील सौंदर्यांचे एक मनोज्ञ दर्शन रसिकांना घडवते. तेव्हा काव्यात्मकतेचा स्पर्श झालेली ही ललितकृती एखाद्या चित्र लिपिसारखी डोळ्यांसमोर साकार होते. कारण निसर्गाशी एकरूप होऊन त्यांनी हे निसर्गाचे चिंतन शब्दबद्ध केले आहे.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-731-9

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5 X 7

MRP:

`175

सूट :

20%

किंमत :

`140

Buy Now

दुर्गा भागवत

दुर्गाबाईंच्या प्रकाशित पुस्तकांची संख्या शंभरच्या घरात जाणारी आहे. त्यांनी स्फुट लेखनही पुष्कळ केले आहे.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top