तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »रौंदाळा

रौंदाळा

Rated 4/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

 या संपूर्ण कादंबरीत गाव केंद्रस्थानी आहे. गावपातळीवर चालणारे राजकारण आणि इच्छे-अनिच्छेने त्यात ओढली जाणारी माणसे, यामुळे हरवत चाललेले माणूसपण या कादंबरीत प्रत्ययाला येते. ‘राडा’ किंवा ‘चिखल’ या अर्थी वापरलेले ‘रौंदाळा’ हे या कादंबरीचे आशयपूर्ण शीर्षकच एका गावाच्या विध्वंसाकडे होत असलेल्या वाटचालीचे निदर्शक  ठरते.  अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक  गरजेएवढी राजकारणाची निकड आज गावागावात जाणवते याचं सूक्ष्म चित्रण खोतांची लेखणी करते.
               सगळा गावच या कादंबरीत आपल्याला दिसतो. गावपातळीवरील  लोक प्रतिनिधी, त्यांचे वाद तसेच घराघरातले वाद या कादंबरीत चव्हाटयावर येतात, त्यातले  राजकारण वाचकाला सुन्न करून सोडते. हा सगळा बदलत्या गावाचा दस्तऐवज लेखक  आपल्या चित्रमय शैलीत मांडतो, ज्यामुळे वाचक अस्वस्थ होत जातो. जुन्यातलं चांगलंही चुरगळून, चोळामोळा करून एक  नवीन, पण बकाल खेडं समोर येतं.

 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-962-7

किंमत :

`275

Buy Now

कृष्णात खोत

कृष्णात खोत हे गावगाडयाला कवेत घेण्याचे सामर्थ्य असलेले लेखक आहेत. खेडयात जन्म झालेले खोत सध्या महाविदयालयात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top