तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » रायगडाला जेव्हा जाग येते

रायगडाला जेव्हा जाग येते

Rated 3/5 based on 11 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

रायगडाला जेव्हा जाग येते हे एक ऐतिहासिक नाटक, ऐतिहासिक एवढ्याच अर्थाने की त्यातील नाट्यवस्तू इतिहासातून कोरलेली आहे. समाजजीवनातील अंतस्त्रोत जाणून घेण्याच्या दृष्टीने इतिहास महापुरूषांच्या चरित्राकडे काहीशा अलिप्तपणे पाहतो. पण त्या पुरोष श्रेष्ठांच्या अंतरंगातून वाहणारे माणूसपणाचे सूक्ष्म, कोमल, मधुर झरे यांविषयी त्याला फारसे कर्तव्य दिसत नाही. कलासृष्टीचा व्यापार नेमका याउलट आहे म्हणून जिथे इतिहास थांबतो तिथे कलासृष्टीचा शोध सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभुराजे ही मराठी मनाची लाडकी दैवते. पण छत्रपतींच्या जीवनातील शेवटची चार वर्षे न्याहाळत असताना या थोर पितापुत्रांच्या आयुष्यात ज्या घडामोडी घडल्या तिथेच काळपुरुषाने एका महान शोकांतिकेचा घाट निर्माण करून ठेवला आहे असे दिसते. त्यातून ध्यानात येते की अवतारतुल्य कार्य करणारी पितापुत्रांची ही जोडी म्हणजे अखेर माणसेच होती.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून आणि विविधरंगी कर्तृत्त्वातून माणूस शोधण्याचा हा एक हृदयस्पर्शी आणि मराठी नाट्यसृष्टीत जवळजवळ पहिलाच प्रयोग.
 

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

81-7185-035-8

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5 X 8.5

किंमत :

`125

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top