तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Biography » गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर

Rated 5/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

गोपाळ गणेश आगरकर

बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक

लेखक : अरविंद गणाचारी

अनुवाद : जास्वंदी वांबूरकर, अरुंधती खंडकर

 

गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा व एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एकमेव बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक म्हणून त्यांच्या भूमिकेचा विस्तृत अभ्यास इंग्रजी भाषेला झाला नव्हता, अरविंद गणाचारी यांनी ही उणीव यशस्वीरीत्या भरून काढली आहे आणि आधुनिक महाराष्ट्रातील उपेक्षित व्यक्तींची इंग्रजी-भाषक अभिजन वर्गाला ओळख करून दिल्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. आगरकरांचा काल व कर्तृत्व यांचे वर्णन करताना छापील दुय्यम साधनांच्या वापराबरोबरच, डॉ. गणचारींनी खाजगी कागदपत्रे, तत्कालीन मुंबई सरकारच्या आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कागदपत्रांमधून यापूर्वी अप्रकाशित अस्सल साधने शोधून काढली आहेत.

     तत्कालीन समाजसुधारकांपेक्षा वेगळे असलेले आगरकर नेमस्त राजकीय सुधारणांच्या बाजूचे नव्हते. भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी कठोरपणे टीका केली आणि स्वराज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. त्यांची बौद्धिक प्रामाणिकता, नैतिक कळकळ आणि आचार-विचारांतील संपूर्ण एकरूपता, या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या काळातील समाजसुधारकांमध्ये आगरकर अग्रगण्य होते.

     आपली विरोधी मते निर्भीडपणे मांडणाऱ्या आणि आपल्या समकालीन लोकांना तशाप्रकारे चर्चा व युक्तिवाद करायला शिकवणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांसारख्या एका एकाकी बुद्धिप्रामाण्यवाद्याची स्मृती जागी ठेवणे आवश्यक ठरते.

  • य. दि. फडके     

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

978-81-7185-112-6

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5" x 8.5"

MRP:

`550

सूट :

30%

किंमत :

`385

Buy Now

Aravind G. Ganachari

Dr. Aravind Gururao Ganachari (b.1951) is a Reader in History at the Department of History, University of Mumbai

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top