तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Play » घाशीराम कोतवाल

घाशीराम कोतवाल

Rated 3/5 based on 2 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

पेशवाईच्या उत्तरार्धात नाना फडणवीसांच्या कारकिर्दीत घाशीराम कोतवाल नावाच्या व्यक्तीने सत्तेच्या आकांक्षेने घातलेल्या धुमाकूळाची आख्यायिका केंद्रस्थानी ठेवून विजय तेंडूलकरांनी या नाटकातून तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक  व राजकीय अध:पतनावर व महाराष्ट्राच्या एकेकाळच्या र्‍हासशील संस्कृतीवर गर्भित पण प्रखर असे भाष्य केले आहे.

सत्ताधारी व सत्ताकांक्षी यांच्यातील स्वार्थी वृत्ती, त्यापायी कोणाचाही बळी देताना मुलाहिजा न बाळगण्याचा त्यांचा बेगुमानपणा, रंगेल, विलासी व सत्तेचा वापर करणार्‍या माणसांमुळे होणारे समाजाचे, कुटुंबव्यवस्थेचे अध:पतन, स्त्रीकडे पाहण्याची वृत्ती, माणसांमधील विषयासक्ती, नीतिबधीरता, सूडबुध्दी, मद इत्यादी प्रवृत्ती अशा अनेक अंत:प्रवाहांमुळे या नाटकाला वेगळे असे वैचारिक परिमाणही मिळाले आहे. उत्तर पेशवाईतील सांस्कृतिक  र्‍हासाचे व नैतिक अध:पतनाचे चित्रण करताना नाना फडणवीस व तत्कालीन ब्राम्हणांची लोलुपता, भिक्षुकीवृत्ती, रंगेलपणाही तेंडूलकरांनी अधोरेखित केली. त्यामुळे घाशीराम कोतवाल हे नाटक  तेंडूलकरांच्या नाटयकारकिर्दीतले एक  खळबळजनक, अपूर्व आणि प्रक्षोभक असे नाटक ठरले.

 

Save

विजय तेंडूलकर यांची इतर पुस्तके

Sakharam Binder
Kamala
Pahije Jatiche
Gidhade

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-676-3

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5"x8.5"

MRP:

`100

सूट :

20%

किंमत :

`80

Buy Now

विजय तेंडूलकर

विजय तेंडूलकर मुख्यत: त्यांच्या नाटयलेखनासाठी, पटकथालेखनासाठी ओळखले जातात.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top