तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ »गाभुळगाभा

गाभुळगाभा

Rated 4/5 based on 3 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

ग्रामीण कथालेखनामध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे लेखक सदानंद देशमुख यांचा हा नवीन कथासंग्रह.समाजव्यवस्थेच्या वर्तुळाचे पहिले आणि शेवटचे टोक कुटुंब असते. ते अबाधित ठेवण्यात स्त्रियांचे योगदान आदिम पातळीवरचे आहे. सृष्टीतत्त्वाशी आपले अंगभूत सृजनतत्त्वाचे नाते जोडून तिनेच पहिल्यांदा भुईच्या पोटी अन्नधान्याच्या बिजवाणाची रुजवण करून कृषिकर्माची सुरुवात केली. त्यातून मानवजातीचे स्थितीशील, विकासात्मक अवस्थेत रूपांतरण झाले. दरम्यानच्या काळात नांगरांचा शोध लागल्यानंतर भुईप्रमाणेच बाईवरही पुरुषी वर्चस्वाने कुरघोडी केली, स्त्रियांना दुय्यम स्थानी ढकलून दिले. असे असले तरी 'पिता-पती-पुत्र' या त्रिस्तरीय नातेसंबंधातून जीवनक्रमण करीत असताना तिने कष्ट, त्याग, श्रद्धा, सोशिकता आणि वात्सल्यभाव इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी कुटुंबसंस्थेत; पर्यायाने समाजव्यवस्थेत काही नैतिक व सांस्कृतिक मूल्ये विकसित केली.
           

Save

सदानंद देशमुख यांची इतर पुस्तके

चारीमेरा
खुंदळघास

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-618-3

स्वरूप :

Hard Cover

किंमत :

`225

Buy Now

सदानंद देशमुख

सदानंद देशमुख कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. ‘गावकळा’ हा कवितासंग्रह, ‘तहान’, ‘बारोमास’ या कादंबर्‍या, ‘लचांड’, ‘उठावण’ ‘महालूट’ ‘रगडा’, ‘खुंदळघास’ हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top