तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Novel » धग

धग

Rated 4.1111111111111111111111111111/5 based on 9 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

१९६० साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी विदर्भातल्या ग्रामीण जीवनाचे प्रभावी चित्रण करते. ही कादंबरी एक शोकांतिका असून वाचकाला हादरवून टाकण्याचे, अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. सतत निसर्गाशी झुंज देणारी पात्रे आपल्या ग्रामीण भाषेच्या लयदार अंगाने आपला सच्चेपणा टिकवून गरिबी, लाचारी, दारिद्रय यांचे प्रत्ययकारी आणि वास्तव चित्रण करते. कौतिक ही या कादंबरीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. तिला कष्टाचे पण स्वाभिमानाचे जगणे हवे आहे पण गरिबी, कुपोषण आणि विवंचना यांना तोंड देताना ती जिद्दी, कष्टाळू, हिंमतीची बाई थकून जाते, भ्रमिष्ट होते. मराठी साहित्याच्या ईतिहासात 'धग' ही कादंबरी 'क्लासिक' समजली जाते, या कादंबरीने अनेक उच्चांक मोडले, सर्व विचारांच्या समीक्षकांनी तिचे मूल्य जोखले आहे. कौतिकची व्यक्तिरेखा, खेड्यातील माणसे, कृषिसंस्कृतीचे जीवनचक्र आणि विदर्भातील बोलीभाषेतले संवाद, निवेदनातून उभे झालेले ग्रामीण जीवनाचे तपशीलवार चित्रण यांमुळे आणि गंभीर कथानकामुळे ही कादंबरी कलात्मकतेचे एक नवे शिखर गाठते. 'पोहा चालला महादेवा' हे उद्धव शेळके यांचे वऱ्हाडी भाषेतील धग कादंबरीवर आधारीत नाटक रंगभूमीवर अत्यंत प्रभावी ठरले.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

ISBN :

978-81-7185-551-3

स्वरूप :

Soft Cover

आकार:

5.5"x8.5"

MRP:

`275

सूट :

20%

किंमत :

`220

Buy Now

उद्धव शेळके

ज्या काळात कादंबरी या साहित्यप्रकाराला उतरती कळा लागली होती त्या काळात उद्धव शेळके यांनी चाकोरीबाहेरचे अनुभवविश्र्व शोधणारे, रोखठोक व रांगडा ओघ असणारे लेखन केले, या वैशिष्ट्यांमुळेच त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या.

Read More

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top