तुम्ही इथे आहात: मुख्यपृष्ठ » Poetry » अजिंठा

अजिंठा

Rated 4/5 based on 1 customer reviews
Ratings

लेखक :


पुस्तका विषयी :

'अजिंठा' हे महानोरांच्या कवितेचे एक वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. चित्रकार मेजर गिल यांची १८४४ साली अजिंठ्याची प्रतिकृती करण्यासाठी नियुक्ती झाली. अजिंठ्याच्या डोंगरावर पारू ही हिंदू आदिवासी मुलगी त्यांच्या सहवासात आली. दहा वर्षांचे त्या दोघांचे सहजीवन. अजिंठ्यातील शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल-पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म आविष्कार. पारूच्या रूपाने अजिंठ्यातील शिल्पे मेजर गिलसमोर सजीव झाली. पारू त्याच्या चित्रांची प्रेरणा ठरली. पण पारूभोवतालच्या आडवळणी समाजाला त्यांच्या प्रेमकथेची भाषा समजू शकली नाही. आणि गिलचे आयुष्य औदासिन्याने झोकाळून गेले. अजिंठा गावाच्या दिल्ली गेटजवळ तिची स्मृती गिलने बांधली. ''टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड २३ मे १८५६.''
       
या प्रेमकथेने अनेक कलावंतांना आजवर भुरळ घातली आहे. लवकरच या दिर्घकाव्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे. असे असले तरी, आपल्या काव्यातून ना. धों. महानोरांनी वर्णन केलेली पारू नेमकी कशी होती, मेजर गिल आणि तिच्यातील हळूवार नाते खुलवताना ना. धों. च्या लेखणीने घेतलेले सौंदर्यपूर्ण वळण अनुभवायचे असल्यास अजिंठा वाचायलाच हवे.

Save

प्रकाशक :

पॉप्युलर प्रकाशन

लेखक :

ISBN :

9788171853076

स्वरूप :

Soft Cover

आकार:

212 X 260 mm

MRP:

`100

सूट :

20%

किंमत :

`80

Buy Now

आपल्याला देखील आवडेल

तुमची मते

Wishlist

back to top