मितवा
Rated 3/5
based on 1 customer reviews
पुस्तका विषयी :
मितवा... हे कवी ग्रेस यांचे आत्मपर ललितबंध आहेत. आत्मपरतेमुळे त्यात आत्मचरित्रात्मक अंश प्राधान्याने आहेतच; पण चरित्रगत वास्तवात नेहमीच सत्य, स्वप्न व भास यांचे जटिल संमिश्रण होत गेल्यामुळे कविप्रतिभेचा एक वेगळाच खाजगी आविष्कार या ललिबंधांमधून जाणवत राहतो. उदासी व असोशीच्या आवर्तांमध्ये मृगजळाची अभंग तृष्णा घुसळून निघावी तशी कवी ग्रेस यांची भाषा अनुभवांच्या उत्कट स्तरांना छेदत छेदत भासचक्राचे तोल सांभाळताना दिसते. त्यामुळे क्वचित स्वत:चेच उदात्तीकरण, क्वचित स्वत:चाच निषेध अशा परस्परविरोधी तणावांमधून कवीचा कठोर आत्मशोध त्यांच्या संवेदनशील मनाच्या अवघड चढउतारांची साक्ष पटवीत राहतो. मी आणि तू म्हणजेच कवी आणि कवीचे आयुष्य यांच्या अनेकपदरी संबंधातून उद्भवणार्या संघर्षनाट्यातील अतिशय उत्कट, आर्त आणि गंभीर स्वगत म्हणजे मितवा.
Save